March 17, 2026

दादर रेल्वे स्थानकाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी’ नाव देण्याची मागणी; कळंब येथे लोजपा (रामविलास)चे धरणे आंदोलन

  • कळंब – मुंबई येथील दादर रेल्वे स्टेशनला “डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी रेल्वे स्टेशन” असे नाव देण्यात यावे,या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)च्या वतीने आज दिनांक १७ मार्च २०२६ रोजी कळंब येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
    या आंदोलनाचे नेतृत्व लोजपा (रामविलास) धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ (अण्णा) गायकवाड यांनी केले.
    यावेळी आंदोलनकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत,देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येत असतात.त्यामुळे दादर येथील रेल्वे स्थानकाला “डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी रेल्वे स्टेशन” असे नाव देणे ही सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत योग्य आणि आवश्यक मागणी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

  • या मागणीसंदर्भात आंदोलनानंतर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.शासनाने ही मागणी तातडीने मान्य करून निर्णय घ्यावा,अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.
    निवेदन देताना लोजपा (रामविलास)चे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ अण्णा गायकवाड,तालुका अध्यक्ष भारत कदम,उपतालुका अध्यक्ष गौतम हजारे,शहर प्रमुख नागेश धीरे, तसेच मुकेश गायकवाड,रवींद्र गायकवाड,दीपक हौसलमल, भाऊ कुचेकर,उमरगा तालुका अध्यक्ष कुंदन कांबळे, बाळासाहेब सोनवणे आदींसह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    या आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते.
error: Content is protected !!