March 17, 2026

मच्छिंद्र दादा गायकवाड युवा प्रतिष्ठानची भीम जयंतीसाठी जय्यत तयारी;नियोजन बैठकीत कार्यकारिणीची निवड

  • कळंब–मच्छिंद्र दादा गायकवाड युवा प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक कळंब येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
    भीम जयंती उत्सव भव्य,
    शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
    बैठकीत जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी राणा सरवदे,उपाध्यक्षपदी किरण सरवदे,सचिवपदी रुपेश इनकर तर कोषाध्यक्षपदी प्रज्वल कांबळे यांची निवड करण्यात आली.
    उत्सवाच्या नियोजनासाठी मार्गदर्शक म्हणून अजय सरवदे, इम्रान मुल्ला,बंडूभाऊ बनसोडे, राहुल माने,शक्ती गायकवाड, आकाश गायकवाड,समीर सय्यद, हुजेब बागवान आणि रंजीत भोसले यांची निवड करण्यात आली.
    जयंती उत्सव समितीचे सदस्य म्हणून सत्यजित कांबळे,संग्राम बनसोडे,यासीर शेख,अंशू कसबे, समीर शेख,अनिकेत खर्डे,गणेश खर्डे,रोहित घाटपारडे,विधान गायकवाड,लखन गांजीकर,
    प्रतीक गायकवाड,प्रेम गायकवाड, अमित गांजीकर,अजित यादव, बबलू सौदागर,पृथ्वीराज गाडे, राजरत्न गाडे आणि अभिषेक कांबळे यांची निवड करण्यात आली.
    यावेळी उपस्थित युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला. जयंतीनिमित्त विविध सामाजिक,सांस्कृतिक तसेच प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
    या बैठकीस परिसरातील अनेक युवक,कार्यकर्ते व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!