धाराशिव (जिमाका) – क्रीडा क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी पुरक घटकांचा सर्वंकष विचार करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर क्रीडाविषयक संशोधने, प्रगती पाहता नियोजनबध्द क्रीडा विकासाचे कार्य हाती घेणे आवश्यक आहे. क्रीडाविषयक कामगिरी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन नोकरीच्या संधी, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र तरुण वर्गास क्रीडाक्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे. राज्यात क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू निर्माण व्हावेत, क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे “क्रीडा विद्यापीठ” स्थापन करण्यात येणार आहे. क्रीडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अधिनियम तयार करण्यासाठी डॉ.माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठाचा अधिनियम तयार करणे, क्रीडा विद्यापीठ अनुषंगिक बाबीची शिफारस करणे, क्रीडा विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शिफारस करणे अशी समितीची कार्यकक्षा आहे. हा अधिनियम तयार करताना क्रीडा क्षेत्रातील तज्ञ, क्रीडा संस्था, एकविध क्रीडा संघटना, खेळाडू, प्रशिक्षक यांचे अभिप्राय/सूचना dsysdesk11@gmail.com या ईमेलवर 20 डिसेंबरपर्यंत पाठविण्यात यावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला