कळंब – कळंब पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक नुकतीच पार पडली.दोन्ही गटांकडे समसमान संख्याबळ असल्यामुळे अखेर चिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया पार पडली.या प्रक्रियेत शिवसेना शिंदे गटाच्या सौ.राजश्रीताई वरपे यांची सभापतीपदी तर भाजपाच्या सौ. प्रणिताताई चव्हाण यांची उपसभापतीपदी निवड झाली. कळंब तालुक्यातील पंचायत समितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आठ सदस्य निवडून आले होते.तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे पाच आणि भाजपाचे तीन सदस्य विजयी झाले होते.त्यामुळे दोन्ही बाजूंचे संख्याबळ समान झाल्याने सभापती आणि उपसभापती पदासाठी चुरशीची लढत निर्माण झाली. सभापती पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सौ.सीमाताई टेकाळे आणि शिवसेना शिंदे गटाच्या सौ. राजश्रीताई वरपे यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यामध्ये नशिबाने राजश्रीताई वरपे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची सभापतीपदी निवड झाली. उपसभापती पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मनोज घोगरे तर भाजपाकडून सौ.प्रणिताताई चव्हाण यांची उमेदवारी होती.या निवडीतही चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये प्रणिताताई चव्हाण यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची उपसभापतीपदी निवड निश्चित झाली. नवीन सभापती राजश्रीताई वरपे आणि उपसभापती प्रणिताताई चव्हाण यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत असून,त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी