कळंब – समाजप्रबोधन, स्वच्छता अभियान आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातून संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी वेचणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कळंब शहरात उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लालबहादुर शास्त्री नगर, पुनर्वसन कळंब येथील महादेव मंदिर परिसरात सोमवारी (ता.२३) हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष सुनंदा कापसे,माजी नगराध्यक्ष बबन वाघमारे तसेच सर्व नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष सुनंदा कापसे,उपनगराध्यक्ष लखन गायकवाड,नगरसेवक अतुल कवडे,शीतलकुमार चोंदे, आशा भवर,हर्षद अंबुरे,अर्चना मोरे,ज्योती हरकर,जमील खाटिक,रोहन पारख,वनमाला वाघमारे,अमर चाऊस,रुकसाना बागवान,शाला पवार,सागर मुंढे, योजना वाघमारे,स्वीकृत नगरसेवक संजय मुंदडा,प्रशांत लोमटे,माजी नगरसेविका आश्विनी शिंदे,व्यावसायिक कैलास राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश शिंदे यांनी केले.सूत्रसंचालन ॲड. निलेश शिंदे यांनी प्रभावीपणे पार पाडले,तर आभार प्रदर्शन अनंत वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमास शहरातील विविध समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री वाघमारे,ओम शिंदे,कृष्णा जाधव, विशाल राक्षे, ऋषी वाघमारे, अक्षय वाघमारे,राहुल चव्हाण आदींनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त कळंबमध्ये भक्तीभाव,सामाजिक जाणीव आणि स्वच्छतेचा संदेश यांचा संगम पाहायला मिळाला. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
More Stories
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा ची दमदार झेप;एनएमएमएसमध्ये चार विद्यार्थी पात्र
वर्धा स्टेट चॅम्पियनशिपमध्ये संकल्पच्या लेकींची दमदार झेप
कर्नल एम.सी.अयप्पा यांची शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाला सदिच्छा भेट;एनसीसी कॅडेट्सना प्रेरणादायी मार्गदर्शन