मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथील दि.२६ फेब्रुवारी २०२६ वार गुरुवार रोजी सहशिक्षक जनार्दन भामरे यांनी आपला वाढदिवस समाजोपयोगी आणि प्रेरणादायी उपक्रमाने साजरा करत विद्यालयाच्या ग्रंथालय विभागाला ‘भारताचे संविधान’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाची प्रत सप्रेम भेट दिली. ज्ञानदान हीच खरी समाजसेवा या भावनेतून त्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला. याप्रसंगी जनार्धन भामरे सर यांनी भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा पाया असलेल्या संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, त्यातून नागरिक कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी आणि संविधानातील मूल्ये आचरणात यावीत,या उद्देशाने ही भेट दिल्याचे सांगितले.वाढदिवस साजरा करताना केवळ औपचारिक कार्यक्रम न करता शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त ठरेल असा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे सर यांना भामरे सरांनी संविधानाची प्रत सुपूर्द केली.यावेळी पर्यवेक्षक सतीश कानगुडे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य मोरे सर यांनी भामरे यांच्या उपक्रमाचे अभिनंदन करत,“शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर केवळ अध्यापनातून नव्हे तर कृतीतून आदर्श निर्माण करावा,” असे मत व्यक्त केले. संविधानासारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथाची भेट ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे विद्यालयात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि संविधानाविषयी जागरूकता वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे.
More Stories
ज्ञान प्रसार विद्यालयात संत गाडगे बाबांना अभिवादन
‘सा.साक्षी पावनज्योत’चा विशेष अंक देऊन वाढदिवस साजरा
ज्ञान प्रसार विद्यालय मोहा येथे शिवजयंती उत्साहात; शिवरायांना अभिवादन