कळंब – राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथे उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.सचिव डॉ.अशोकराव मोहेकर व प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले.यावेळी गाडगेबाबा यांच्या समाजप्रबोधन कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागासाठी गाडगेबाबा हे प्रेरणास्थान मानले जातात. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले.समाजातील अंधश्रद्धा,नकारात्मक रूढी-परंपरा यांच्यावर टीकास्त्र सोडून समाजजागृतीचे कार्य त्यांनी केले.त्यांच्या विचारांमुळे समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यास मोठी मदत झाली. कार्यक्रमास प्रा.डॉ.गुंडरे,प्रा.डॉ.
चिंते,प्रा.डॉ.सूर्यवंशी,प्रा.डॉ.बोंदर, प्रा.डॉ.महाजन,प्रा.डॉ. ढोले, प्रा. डॉ. वेदपाठक, प्रा. डॉ. पावडे, अधीक्षक श्री. हनुमंत जाधव, प्रा. प्रताप शिंदे, प्रा. शेळके, प्रा. बुधवंत, प्रा. माने, प्रा. बालाजी राऊत, प्रा. मानेकर, प्रा. मुखेडकर मॅडम, प्रा. डॉ. वर्षा सरवदे, श्रीमती वाघमारे मॅडम, पांचाळ मॅडम,प्रा.शिंदे, प्रा. सुरज पाटील, प्रा. शाहरुख शेख, प्रा. तांबोळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी अमोल सुरवसे,अजय भावे, हाके,जीवन वाघमारे, साजिद शेख,बंडू शेळके आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
More Stories
कर्नल एम.सी.अयप्पा यांची शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाला सदिच्छा भेट;एनसीसी कॅडेट्सना प्रेरणादायी मार्गदर्शन
राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कळंबमध्ये अभिवादन
कष्ट,प्रामाणिकपणा आणि ध्येयवेड – सौ.अश्विनी आंबिरकर यांची यशोगाथा ठरतेय महिलांसाठी आदर्श