कळंब–सकल मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती,कळंब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.या शिबिरात तब्बल ३०० शिवभक्तांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित केली. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी नगराध्यक्ष सुनंदा शिवाजी कापसे,शिवसेना नेते अजित पिंगळे,नायब तहसीलदार गोपाळ तापडिया, डॉ.रमेश जाधवर,डॉ.अभिजित जाधवर,सतीश टोणगे,भैय्या बाविकर,बाळासाहेब धस, शितलकुमार घोंगडे आदी मान्यवरांनी शिबिरास भेट देत रक्तदात्यांचे प्रोत्साहन वाढविले. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत चाललेल्या या शिबिरात रक्तदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.संकलित करण्यात आलेले रक्त चार नामांकित रक्तपेढ्यांना सुपूर्त करण्यात आले.त्यामध्ये भगवंत ब्लड बँक (बार्शी),सह्याद्री ब्लड बँक (धाराशिव),रेणुका ब्लड बँक (धाराशिव)आणि बीड ब्लड बँक यांचा समावेश होता. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. संजय घुले,अतुल गायकवाड, बाळासाहेब कथले,यश सुराणा, ओंकार कुलकर्णी,भाऊसाहेब शिंदे,पंकज कोटेचा,गजानन फाटक,प्रा.अरविंद शिंदे,राजेंद्र बिक्कड,गोविंद खंडेलवाल, अशोक फल्ले,प्रा.जगदीश गवळी, ॲड.शकुंतला फाटक,मनोज चोंदे, प्रकाश खामकर,नवनाथ पुरी, मनोज फल्ले,संकेत भोरे,धर्मराज पुरी,रोहित किरवे,राहुल किरवे, विश्वजीत पुरी आदींनी विशेष परिश्रम घेतले. या महारक्तदान शिबिरामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून,कळंब शहरातील सामाजिक ऐक्याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी