कळंब – रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त कळंब शहरात समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,मुंबई संलग्न धाराशिव प्रेस क्लब शाखा कळंब यांच्या वतीने अन्नदान,पाणी बॉटल वाटप आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत तब्बल ५०० नागरिकांना अन्नदान करण्यात आले,तर १४०० पाणी बॉटलचे वितरण करण्यात आले.तसेच आयोजित रक्तदान शिबिरात १७ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.कळंब शहरात जयंतीनिमित्त दाखल झालेल्या शिवभक्तांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते झाले.यावेळी तहसीलदार हेमंत ढोकले,नायब तहसीलदार तापडिया,कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मगर, वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, धाराशिव प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष रहीम शेख,तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश बप्पा टोणगे,माजी नगरसेवक प्रताप मोरे,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत,रेणुका इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा शरद जादवर,मंडल अधिकारी जगताप,News 18 चे जिल्हा प्रतिनिधी बालाजी निरफळ,प्राचार्य जगदीश गवळी, समाजसेविका ज्योतीताई सपाटे, समाजसेवक बौधराज (अण्णा) रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार सुधाकर रणदिवे,अमर चोंदे,शिवप्रसाद बियाणी,राहुल गाडे,सतीश तवले,अझहर पठाण, राजेंद्र बारगुले,पवन बोबडे यांचे सहकार्य लाभले.विशेष म्हणजे पत्रकार अमर चोंदे यांचे अवघ्या ८ वर्षांचे चिरंजीव शिवकुमार चोंदे यांनीही मनापासून शिवभक्तांची सेवा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
More Stories
लेखकाने स्वतःचे साहित्य जन्मभूमीत प्रकाशित करावे — ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे
महारक्तदान शिबिरात ३०० शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग; चार रक्तपेढ्यांना रक्तसंकलन सुपूर्त
गायकावर मध्यरात्री कथित मारहाण;पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी