गजानन जाधव यांची सलग तिसऱ्या वर्षी सामाजिक बांधिलकी
कळंब – तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पानगाव संचालित संत ज्ञानेश्वर माऊली महाराज मूकबधिर विद्यालय,कळंब येथे शिवजयंती उत्सवानिमित्त विशेष स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक गजानन जाधव यांच्या पुढाकारातून करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यालयातील सर्व मूकबधिर विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.गजानन जाधव हे सलग तीन वर्षांपासून शिवजयंतीच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करत असून, त्यांच्या या सातत्यपूर्ण सेवाभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमास गजानन फाटक, राजेंद्र बारगुले (सा.साक्षी पावनज्योत विशेष प्रतिनिधी), सुमित बलदोटा,सुभाष अण्णा फाटक,रवी मुंडे,जगताप सर, लक्ष्मण घोडके,अमर खामकर, राजदीप तोर,अमित फाटक, दीपक माळी,अमर चाऊस (नगरसेवक),नितीन यादव,योगेश अंधारे तसेच रोहित धोकटे (नगरसेवक) आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.विद्यार्थ्यांनीही आनंदाने सहभाग घेतला.शिवजयंतीच्या पवित्र निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे समाजात सेवाभाव व सामाजिक एकात्मतेचा सुंदर संदेश देण्यात आला.
More Stories
सा.साक्षी पावनज्योतच्या प्रतिनिधींची नियुक्ती
सेवानिवृत्त मंडळ अधिकारी भागवत वाघमारे यांना बंधूशोक
कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल,तांदुळवाडी येथे ‘शिवजन्मोत्सव’ उत्साहात साजरा