कळंब– शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुका व विविध सार्वजनिक कार्यक्रम सुरळीत पार पडावेत,यासाठी कळंब पोलीस प्रशासनाने विशेष नियोजनासह चोख बंदोबस्त ठेवला होता. उत्सव सांस्कृतिक परंपरा जपत पार पडावा आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये,यासाठी पोलिसांनी दिवसभर दक्षता घेतली.परिणामी शहरात शांतता व सुरक्षिततेचे वातावरण कायम राहिले आणि नागरिकांनी शिवजयंतीचा आनंद निर्धास्तपणे लुटला. या बंदोबस्तात डी.वाय.एस.पी. पवार,पी.आय.चिंतले,ए.पी.आय. मगर,फुंडगे मॅडम,पी.एस.आय. पठाण,घाडगे तसेच RCB व LCB पथक आणि कळंब ट्रॅफिक शाखेचे पोलीस कर्मचारी सुरज गायकवाड व शेळके यांनी सक्रिय सहभाग घेतला.त्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण व्यवस्था सुरळीत पार पडली. दरम्यान,जनतेच्या सुरक्षेसाठी २४ तास तत्पर राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शहरातील सामाजिक संस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे. शहरातील दयावान प्रतिष्ठान कळंब तर्फे सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
More Stories
कळंबमध्ये ‘काव्य मैफिल’ व विज्ञानाधारित चमत्कार सादरीकरण;अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृतीचा उपक्रम
आंबेडकरी विचारांचा प्रभाव; कुणाल जगतापची सैनिक स्कूल साताऱ्यात झेप
कौशल्याधिष्ठित शिक्षण हीच काळाची गरज – डॉ.अशोकराव मोहेकर