कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर व छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब येथील आयक्युएसी व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सहसचिव प्रा.संजयजी घुले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हनुमंत माने व रासेयो विभाग प्रमुख प्रा. अभिमान ढाणे यांच्या हस्ते विश्वरत्न,परमपूज्य बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. हनुमंत माने यांनी आपले ठळक मत व्यक्त करताना सांगितले की, “मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आल्यामुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच गती मिळाली आहे.” परमपूज्य विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विद्यापीठ नामविस्ताराच्या ऐतिहासिक लढ्याचे व त्यामागील सामाजिक महत्त्वाचे विवेचन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव