February 8, 2026

मोहेकर महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • वसुंधरा गुरव व साक्षी वटाणे प्रथम
  • कळंब (अरविंद शिंदे) – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय व चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संस्थामाता कै.सुमनबाई (वहिनी) मोहेकर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
    या स्पर्धेचे हे सलग दुसरे वर्ष होते.

  • स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास बीड कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप मडके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,तर अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर होते.यावेळी बोलताना रामराजे चांदणे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी वक्तृत्व स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असून,अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळते.”
    या जिल्हास्तरीय स्पर्धेत शालेय गटातील ४२ व महाविद्यालयीन गटातील १६ असे एकूण ५८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या वक्तृत्वकौशल्याचे प्रभावी सादरीकरण केले.
    स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
    शालेय गट : प्रथम – वसुंधरा संजय गुरव (धाराशिव),द्वितीय – राशी हनुमंत खोत (तेरखेडा),तृतीय – वीरेन गणपती आडसूळ (घारगाव),उत्तेजनार्थ – रिया आडसूळ,ज्ञानेश्वरी धावडे, अमृता शिंदे,सुषमा मोरे,ईश्वरी बारस्कर
    महाविद्यालयीन गट : प्रथम – साक्षी बाळासाहेब वटाणे (मोहेकर महाविद्यालय),द्वितीय – प्रतीक्षा शिवाजी लिमकर (परंडा),तृतीय – समर्थ लक्ष्मण लोंढे (नळदुर्ग),उत्तेजनार्थ – ऋषिकेश वाघे, अश्विनी गिरी,आकाश बारस्कर,आदित्य चव्हाण,सिद्धी पाटील
    स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राचार्य महादेव गपाट,हरिश्चंद्र ओताडे,डॉ. गणेश पाटील,प्रा.सुनील भिसे, व्ही.एच.चेवले,सोपान पवार व मुस्तान मिर्झा यांनी जबाबदारी पार पाडली.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी केले,पारितोषिक वाचन डॉ. दादाराव गुंडरे यांनी केले,तर आभार प्रदर्शन अरविंद शिंदे यांनी मानले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी किरण बारकुल, सारुख शेख,अक्षय खंडागाळे, संतोष मोरे,डॉ.जयवंत ढोले,डॉ. नामानंद साठे,डॉ.ज्ञानेश चिंते, संदीप सूर्यवंशी,आदित्य मडके, उमेश साळुंके तसेच महाविद्यालयातील विविध समित्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!