कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे भारतीय संस्कृतीतील महिलांसाठी विशेष महत्त्व असलेल्या मकरसंक्रांतीचे औचित्य साधून हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समईचे दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्यासह विद्याभवन विद्यामंदिर शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमामुळे भारतीय संस्कृतीचे जतन व सामाजिक सलोखा वृद्धिंगत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव