खाऊ गल्ली,भाजीपाला व फळांच्या विक्रीतून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान
कळंब — कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले.या मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधवराव पाटील,उपसरपंच महावीर डिकले यांच्या हस्ते व शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतातील चिक्कू,बोरे, पेरु,ऊस यांसह विविध फळे तसेच मेथी,चुका, शेपू,वाटाण्याच्या शेंगा आदी भाजीपाला विक्रीस ठेवला होता. काही विद्यार्थ्यांनी मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची विक्रीही केली. मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरली ती खाऊ गल्ली.येथे विद्यार्थ्यांनी व पालकांनी घरी तयार केलेले वडापाव, पावभाजी, इडली-सांबार,समोसे,भेळ,रगडा, पाणीपुरी,पॅटीस आदी खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले होते.गावातील महिला,तरुण,युवक-युवती,ज्येष्ठ नागरिक व पालकांनी मोठ्या उत्साहात खरेदी करत मेळाव्याचा आनंद घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना जाहिरात कशी करावी,वस्तूंची विक्री, आर्थिक व्यवहार व व्यवहारज्ञान याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. हा आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक संतोष मोहिते,सयाजी शिंदे,श्रीमती रसिका आगरकर,आशा पवार, स्वयंपाकी कर्मचारी सौ.रुक्मिणी डिकले व मयुरी डिकले यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच शालेय समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका,आशा कार्यकर्त्या व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी