February 8, 2026

सुभाष घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त डिकसळ येथे पालावरील नागरिकांना फळेवाटपाचा सामाजिक उपक्रम

  • डिकसळ – कळंब तालुक्यातील डिकसळ परिसरात पालावर वास्तव्य करणाऱ्या बेरोजगार व गरजू नागरिकांसाठी माणुसकीचा आधार ठरणारा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सा.साक्षी पावनज्योत या वृत्तपत्राचे मुख्य संपादक सुभाष घोडके यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त दि.९ जानेवारी २०२६ वार शुक्रवार रोजी हा उपक्रम साजरा करण्यात आला.
  • या उपक्रमांतर्गत पालावर राहणाऱ्या बेरोजगार व उपेक्षित घटकांना फळांचे वाटप करण्यात आले.वाढदिवस साजरा करण्याची पारंपरिक पद्धत टाळून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा आदर्श यावेळी उपस्थितांसमोर ठेवण्यात आला.
    सामाजिक बांधिलकी जपत सुभाष घोडके यांनी वाढदिवसाचे औचित्य समाजोपयोगी कार्यातून साजरे केले,याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
  • यावेळी धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,कळंबचे विश्वस्त सुनिल गायकवाड,लोकजन शक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत, व्यावसायिक सुरेश कटकुरे, पापशेठ कुंभार, विशाल भंडारे, राकेश घोडके तसेच प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अविनाश यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
    उपस्थित मान्यवरांनी सुभाष घोडके यांच्या सामाजिक, पत्रकारिता व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!