February 8, 2026

‘सा.साक्षी पावनज्योत’ कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

  • कळंब – बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देणारे आणि ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत मडके यांच्या सहकार्याने शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कार्यरत असलेल्या कळंब शहरातून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक ‘साक्षी पावनज्योत’ कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन मुख्य संपादक सुभाष द.घोडके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील गणेश चित्र मंदिर रोड,मार्केट यार्ड येथे दि.९ जानेवारी २०२५,वार शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता उत्साहात पार पडले.
  • या भूमिपूजन समारंभास कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्यदक्ष सभापती शिवाजी (आप्पा) कापसे,नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे,ओम बालरुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ.रमेश जाधवर, तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतिश टोणगे,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष सुनिल गायकवाड,लोकजन शक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड तसेच सा.साक्षी पावनज्योतचे अभ्यासू व निर्भीड व्यक्तिमत्व असलेले मुख्य संपादक सुभाष द.घोडके यांच्या शुभहस्ते भूमिपूजन विधी संपन्न झाला.

  • यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की,साक्षी पावनज्योत हे साप्ताहिक केवळ वृत्तपत्र नसून बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारे,अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेणारे व लोकशाही मूल्ये जोपासणारे प्रभावी माध्यम आहे.नवीन कार्यालयाच्या माध्यमातून पत्रकारितेचे कार्य अधिक व्यापक,प्रभावी व लोकाभिमुख होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    या कार्यक्रमास मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,दिगंबरराव कटकुरे,व्यावसायिक सुरेश कटकुरे,मिस्त्री पापा कुंभार,डॉ.निखिल नागरगोजे,डॉ.रुपेश कवडे, डॉ.शेख,डॉ.राम निळकंठ,व्यावसायिक विक्रम भंडारे,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत,व्यावसायिक सचिन तिरकर,अमित भंडारे,विनायक रामढवे,व्यावसायिक चंद्रकांत चाटे,राजेंद्र वाघमारे,खादी ग्रामोद्योग संघाच्या संचालिका सौ. रंजना सुभाष घोडके,सौ.उषा सुरेश कटकुरे तसेच राकेश घोडके,कार्यकारी संपादक अविनाश घोडके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्य संपादक सुभाष द. घोडके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.उपस्थित मान्यवरांनी साक्षी पावनज्योतच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकीची पत्रकारिता अधिक सक्षम व्हावी,अशी अपेक्षा व्यक्त केली.

error: Content is protected !!