February 8, 2026

समाजासाठी अखंड ध्यास घेणारे प्रेरणादायी नेतृत्व म्हणजेच मा.हनुमंत (तात्या) मडके

  • शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी पाहिलेले भव्य स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कार्यरत असलेला मोहेकर उद्योग समूह आज संपूर्ण परिसरासाठी आशेचा किरण बनला आहे.
    ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हे कार्य सातत्याने पुढे नेणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे— मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष,माजी माध्यमिक शिक्षक हनुमंत (तात्या) मडके!
  • शिक्षक म्हणून अनेक वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य बजावताना समाजाशी घट्ट नाळ जोडून ठेवणारे तात्या यांनी सेवानिवृत्तीनंतरही समाजसेवेची नाळ तुटू दिली नाही. ‘समाजासाठी काहीतरी देणे लागतो’ या भावनेतून त्यांनी उद्योग,शिक्षण,अर्थकारण व सामाजिक बांधिलकीचा सुंदर समन्वय साधत कार्याची नवी दिशा दिली.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या विचारांचा वारसा जपत विविध संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम उभे करण्याचे मोठे कार्य त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले.
    मोहा व परिसरातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराची दारे खुली करून त्यांना हक्काचे काम आणि योग्य मोबदला मिळवून देण्याचे कार्य तात्यांनी उद्योगांच्या माध्यमातून केले.त्यामुळे अनेक युवकांचे जीवनमान स्थिर झाले, स्वावलंबनाचा मार्ग सुलभ झाला. स्थानिक युवकांना प्राधान्य देऊन रोजगारनिर्मिती करण्याचा त्यांचा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने सामाजिक जबाबदारीचे उज्ज्वल उदाहरण ठरतो.
    शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर अँग्रो इंडस्ट्रीज,मोहा यांच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संतोष मडके यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त दर मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न शेतकरी वर्गासाठी मोठा दिलासा ठरला.स्टील इंडस्ट्रीजच्या माध्यमातून परिसरातील पत्रा व स्टीलची गरज स्थानिक पातळीवर पूर्ण होत असून नागरिकांचा वेळ,खर्च वाचतो आणि स्थानिक रोजगारालाही बळकटी मिळते.
    आर्थिक क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को–ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,मोहा यांच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके यांच्या नेतृत्वाखाली नवउद्योजक,व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करून अनेकांच्या अडचणी सोडविण्याचे कार्य त्यांनी यशस्वीरीत्या केले.
    महाराष्ट्रासह कर्नाटकसारख्या राज्यांत शाखा स्थापन करून त्यांनी आर्थिक सेवेला विस्तृत दिशा दिली आहे.
    उद्योग व अर्थकारणापुरते न थांबता सामाजिक,शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग तितकाच उल्लेखनीय आहे.शांत,संयमी, मनमिळावू व अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे ते सामान्य नागरिकांपासून मान्यवरांपर्यंत सर्वांचेच विश्वासपात्र नेतृत्व म्हणून ओळखले जातात.त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रतिष्ठित दै. लोकमत समूहाने प्रकाशित केलेल्या “धाराशिव आयकॉन” या पुस्तकात त्यांची विशेष नोंद करण्यात आली असून १७ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचा सन्मानही करण्यात आला. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येक हाताचा गौरव आहे, असे यावेळी व्यक्त करण्यात आले.
    अशा समाजशील,लोकाभिमुख आणि प्रेरणादायी नेतृत्वाचे वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील आयुष्याला उत्तम आरोग्य,यश आणि समाजसेवेच्या कार्याची अखंड प्रेरणा लाभो,अशी मंगलकामना.
  • शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातून प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावनज्योत परिवार व प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था,कळंबच्या वतीने वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा,तात्या! 🙏💐🎂🌹🎉
  • ✍️ — अविनाश रंजना सुभाष घोडके
    कार्यकारी संपादक – सा.साक्षी पावनज्योत
    सचिव – प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था,कळंब
error: Content is protected !!