February 8, 2026

‘बालिका दिन’ म्हणून साजरी सावित्रीबाई फुले जयंती;ज्ञान प्रसार विद्यालयात सांस्कृतिक उत्सव रंगला”

  • कळंब – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे जयंती उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडले.
    स्त्री शिक्षणाच्या जननी व देशातील पहिल्या महिला शिक्षिका – मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रशालेमध्ये “बालिका दिन” म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या प्रांगणात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. प्रतिभा सावंत,श्रीमती नीता सोनवणे व श्रीमती उषा पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अविनाश मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर उपस्थित होते. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक सतीश कानगुडे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्रा. सुनील साबळे आणि प्राथमिक विभागाचे सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांची उपस्थिती होती.
    या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम,प्रबोधनात्मक भाषणे आणि ‘सावित्रीच्या लेकी’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या कार्यावर आधारित नाटिका, गौरवगीते तसेच अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात इयत्ता ५ वी ते ८ वीतील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
    या कार्यक्रमाचे छायाचित्र व व्हिडिओ चित्रीकरण संजय आडणे व प्रा.राहुल भिसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका बाराखोते हिने तर आभार प्रदर्शन कु.वैष्णवी मडके हिने केले.
error: Content is protected !!