कळंब – कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १७५ वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष रवी नरहिरे, उपाध्यक्षा सौ.आशा नरहिरे व सचिव प्रणव नरहिरे यांनी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक पवनकुमार कुलकर्णी यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून अभिवादन केले.धावारे बंधूंनी सावित्रीबाईंच्या कार्याचा प्रभावी आढावा घेत नमनगीत सादर करून वातावरण प्रेरणामय केले. इयत्ता ४ ते ६ वीतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या पारंपरिक वेशभूषेत मनोगत व्यक्त केले. तसेच ओव्या व प्रश्नमंजुषा या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन करताना स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी केलेला संघर्ष हे सतत प्रेरणादायी आदर्श असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवीतील चिमुकल्या विद्यार्थिनी राजनंदिनी शितोळे व सृष्टी गुरव यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. पूजा भोसले यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रशांत भोले,सौ.अर्चना बावीकर,प्रीतम वेदपाठक,हरिदास रोकडे,प्रशांत व विशाल धावरे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड