February 8, 2026

आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधावा – प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथे जीवन शिक्षण व विस्तार विभाग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकास व पर्यावरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर (भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय, केज ) म्हणाले,”जीवनात यशस्वी होण्यासाठी अंतरबाह्य बदल होणे अपेक्षित असते. युवकांनो उठा झेप घ्या दिशा,तुम्हांला शरण येतील,अशा स्वामी विवेकानंदासारख्या महापुरुषांच्या विचारांची जोपासना करावी. त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडण्याची नितांत गरज असते. “
    कार्यशाळेची सुरुवात संस्थेचे संस्थापक पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली.तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल,पुष्पहार आणि आदर्श मराठी व्याकरण व लेखन हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
    यावेळी उद्घाटक म्हणून ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर उपस्थित होते. यावेळी उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले, “आजच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे.यावरच पुढील भवितव्य अवलंबून आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी अंतर्बाह्य बदल अपेक्षित असतो. अशा कार्यशाळेतून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास साधला जातो यावेळी हनुमान बुधवंत यांनी आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले,आज शेती व शेतीपूरक असलेल्या व्यवसायांना खूप मोठे बाजारपेठ उपलब्ध आहेत.भाजीपाला व फळबाग प्रक्रिया उद्योगांमधून आंतरराष्ट्रीय चलन सुद्धा उपलब्ध करता येते,स्वावलंबी होऊन नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग मोठ्या प्रमाणात उभा करता येतो. त्यांनी विविध उद्योगांच्या उभारणीविषयी माहिती दिली.”
    याचपद्धतीने सौ.कमलताई कुंभार ( यशस्वी स्वयं उद्योजक हिंगळजवाडी ता.जि.धाराशिव) यांनी लघु उद्योग निर्मिती करून ग्रामीण भागातील बचत गटांच्या माध्यमातून तीन ते चार हजार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थिती म्हणून महिलांना रोजगाराची दिशा दाखवून दिलेली आहे.त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे.महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी होण्यासाठी अशा लघुउद्योगांच्या माध्यमातून स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास केला पाहिजे.
    यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ.संजय कांबळे (सिनेट सदस्य बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ) उपप्राचार्य के.डी.जाधव,प्रा.जयंत भोसले यांची उपस्थिती होती.
    यावेळी डॉ.व्ही.टी.सरवदे,डॉ.नामानंद साठे,डॉ.रुपेश मानेकर,डॉ.हेमंत चांदोरे,प्रा.ए.आर.मुखेडकर,प्रा.राम दळवी,प्रा.दिलीप नवघरे,डॉ.डी.एन.चिंते,प्रा.
    सुरनर, प्रा.अनंत नरवाडे,प्रा.बालाजी वाघमारे,प्रा.शाहरुख शेख उपस्थित होते. सदर दोन दिवसीय कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.दादाराव गुंडरे यांनी सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी तर आभार डॉ.श्रीकांत भोसले यांनी मानले.
    उद्घाटन कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रबंधक हनुमंत जाधव,डॉ. परमेश्वर वाकडे,कमलाकर बंडगर,अर्जुन वाघमारे यांनी प्रयत्न केले.
error: Content is protected !!