कळंब – शहरातील यशवंत नगर येथे वास्तव्यास असलेल्या सेवानिवृत्त आयटीआय लेखापरीक्षक आयु.सुरेंद्र भिकाजी शीलवंत यांच्या कन्या डॉ.प्रज्ञा सुरेंद्र शीलवंत यांना दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी,सोमवार,सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज,बीड येथे आयोजित समारंभात महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र घोषाल यांच्या हस्ते बी.एच.एम.एस पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला डॉ. प्रज्ञा यांचे पिताश्री सुरेंद्र शीलवंत,मातोश्री सुषमा शीलवंत व भाऊ डॉ.संदीप शीलवंत हे उपस्थित होते.तसेच बीड शहरातील मान्यवर राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व कर्मचारी वर्गाची उपस्थिती लाभली. डॉ.प्रज्ञा शीलवंत यांच्या या यशामुळे कळंब शहरासह परिसरात अभिमानाची भावना व्यक्त केली जात असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी