February 8, 2026

विद्याभवन हायस्कूल शाळेचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

  • कळंब – पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेमध्ये लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंबच्या खेळाडूंनी मोठे यश संपादन करत क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम केले आहे.
    या राज्यस्तरीय स्पर्धेमधून तब्बल तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यामध्ये १७ वर्ष वयोगटातून वसुंधरा मुकुंद नांगरे महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक १४ वर्ष वयोगटात विनय राजाभाऊ शिंदे महाराष्ट्रात प्रथम क्रमांक विवेक शिवाजी शिंदे महाराष्ट्र द्वितीय क्रमांक या तीन खेळाडूंची दिल्ली होते येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.याबरोबर १४ वयोगातील मुलांच्या संघाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवित गोल्ड मेडल पटकावले या संघात विवेक शिंदे,विनय शिंदे,राहुल बोंदर,प्रेम नरवडे तर १४ वर्ष मुलीच्या संघाचा महाराष्ट्रात तृतीय क्रमांक मिळवत ब्रांन्झ मेडल पटकावले या संघात सिद्धी वाघमारे,प्रिया गायकवाड,शिवक्रांती गायकवाड, अमृता सावंत यांचा सहभाग होता. या सर्व यशस्वी खेळाडूंचा तसेच त्यांना प्रशिक्षण देणारे राजाभाऊ शिंदे,क्रीडा विभाग प्रमुख संजय मडके या सर्वांचा सत्कार ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ. अशोकरावजी मोहेकर,संचालिका अंजलीताई मोहेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी रोटरी क्लबचे संजय घुले,न.प. प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद नांगरे,शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट कुंभार,उप मुख्याध्यापक विक्रम मयाचारी,पर्यवेक्षिका जगदेवी कोळी यांच्यासह पालक प्रतिनिधी म्हणून अतुल गायकवाड,शाहू सावंत,सुनील गायकवाड,वाघमारे सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळे बी.एन. यांनी केले तर आभार प्रदर्शन सुशील तीर्थकर यांनी केले.
  • 🛑 खेळामुळे शारीरिक क्षमते बरोबर बौद्धिक क्षमता ही वृद्धिंगत होते म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मैदानावर असणे गरजेचे आहे.
    – डॉ.अशोकराव मोहेकर
    सचिव ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा.
error: Content is protected !!