February 8, 2026

कॅनव्हास स्कूलचा धमाकेदार यशमार्क! – शार्व पाटीलची ‘होमी भाभा’ द्वितीय फेरीसाठी निवड

  • कळंब – कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलचा इयत्ता सहावीतील विद्यार्थी शार्व पाटील याची प्रतिष्ठेच्या ‘होमी भाभा विज्ञान परीक्षा’ यांच्या द्वितीय फेरीसाठी निवड झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या परीक्षेत शाळेतून इयत्ता ६ वी व ९ वीमधील एकूण २० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
    इयत्ता सहावीतील यशस्वी विद्यार्थी:अन्या ताटीपामुल, काव्या जाधवर,कृष्णाली बावळे,शुभश्री रीतापुरे,सौम्या नारकर,विहानराजे दिवाणे व ओम जाधवर.
    इयत्ता नववीतील यशस्वी विद्यार्थी:
    समृद्धी सलगर,अनिशा नांदे, शंभूराज निकम, प्रांजल देशमुख व युगंधरा देशमुख.
    या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष रवि नरहिरे,उपाध्यक्षा सौ. आशा नरहिरे,सचिव प्रणव नरहिरे, मुख्याध्यापक पवन कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.शाळेतील शिक्षकवर्गाच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
error: Content is protected !!