मोहा – भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी रायगडच्या पायथ्याशी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून अन्यायकारक जातिव्यवस्था, स्त्रियांवरील अन्याय, दलितांवरील अत्याचार, भेदभाव व अमानवी नियमांविरोधात ऐतिहासिक प्रतिकाराचा संदेश दिला होता. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी मोहा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोर मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून “संविधान जिंदाबाद” अशा जोरदार घोषणांमध्ये हा कार्यक्रम पार पडला. सामाजिक समतेचा, मानवतेचा व संविधानिक मूल्यांचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ऑल इंडिया पॅंथर सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कसबे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कसबे, माजी उपसरपंच दिलीप जाधव, गणेश कसबे, आकाश कसबे, संकेत कसबे, कोंडीबा कसबे, अजय कसबे, फकीर कसबे, शुभम कांबळे, अभिजीत कसबे यांच्यासह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते. मनुस्मृती दहनाच्या माध्यमातून सामाजिक अन्यायाविरोधात एकजुटीचा आणि संविधाननिष्ठेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन