February 8, 2026

सात्रा गावची लेक चमकली;डॉ.शितल शिंदे यांची एम.डी.साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवड

  • कळंब– कळंब तालुक्यातील सात्रा गावच्या कन्या डॉ.कु.शितल महादेव शिंदे यांनी वैद्यकीय नीट पी.जी. २०२५ प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करत नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी.(रेडिओलॉजी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांच्या स्वगृही सत्कार करण्यात आला.
    डॉ.शितल शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण विद्याभवन,कळंब येथे झाले असून इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण त्यांनी लातूर येथील राजर्षी शाहू कॉलेजमध्ये पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस.चे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील व भाऊ यांना दिले आहे.
    या सत्कार समारंभास सात्रा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पवार,तात्यासाहेब सुरवसे, रमेश शिंदे, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी पटणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.डॉ.शितल शिंदे यांच्या या यशामुळे सात्रा गावासह परिसरात शिंदे कुटुंबाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
error: Content is protected !!