March 26, 2026

“वॉटर स्थापना दिनानिमित्त गौर–इटकूरमध्ये श्रमदानाची चळवळ;स्वच्छता व जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम”

  • कळंब – वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR),कळंब विभागाच्या वतीने शनिवार,दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी “वॉटर स्थापना दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून गौर व इटकूर या गावांमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून श्रमदान उपक्रम राबविण्यात आला.
    इटकूर गावामध्ये सकाळी ७ ते ९.३० या वेळेत व्यापक ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये जि. प. प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय व बाजार मैदान या ठिकाणी स्वच्छता करून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी श्रमदान करण्यात आले. तर गौर गावामध्ये श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करून जलसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
    या उपक्रमास प्रशासकीय विभागातील ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,ग्रामपंचायत कर्मचारी,शाळेतील विद्यार्थी व शिक्षक,ग्रामस्थ,वॉटर संस्थेअंतर्गत कार्यरत सर्व गावांतील वसुंधरा सेवक व महिला प्रवर्तक,शेतकरी उत्पादक कंपनीचे कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
    वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट कळंब येथील कर्मचारी आशुतोष शिंदे, मनीष फंदे,साहिल तुपे,सागर हाडे, प्रियदर्शनी कांबळे व महेश माळी यांनी या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत सक्रिय सहभाग नोंदवला.या श्रमदान उपक्रमातून स्वच्छता,पाणी अडवणे व जनजागृतीचा संदेश देण्यात आला असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
error: Content is protected !!