कळंब –डिकसळ येथील शासकीय रेशन दुकानाची पर्याय व्यवस्था कळंब येथे दिल्यामुळे डिकसळ परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही पर्याय व्यवस्था तात्काळ रद्द करून डिकसळ येथीलच शिधापत्रिका धारकांना गावातच धान्य मिळावे,अशी जोरदार मागणी दयावान प्रतिष्ठान अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला , मोबीन मणियार,अभय गायकवाड डिकसळच्या वतीने करण्यात आली आहे. डिकसळ येथील शासकीय रेशन दुकान क्रमांक २ ची पर्याय व्यवस्था कळंब येथील दुकानावर देण्यात आली असून त्यामुळे नागरिकांना लांब अंतर प्रवास करावा लागत आहे. विशेषतः वृद्ध,महिला व गरीब नागरिकांसाठी ही व्यवस्था अत्यंत गैरसोयीची ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित रेशन दुकानदाराकडे आधीच तीन पर्याय व्यवस्था असल्यामुळे डिकसळ येथील नागरिकांना वेळेवर धान्य मिळण्यात अडथळे निर्माण होत असून लाभार्थ्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर कळंब येथील पर्याय व्यवस्था तात्काळ रद्द करून डिकसळ येथील शिधापत्रिकाधारकांना डिकसळमधीलच योग्य रेशन दुकानावर पर्याय व्यवस्था देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार कळंब यांच्याकडे करण्यात आली आहे.प्रशासनाने या विषयावर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड