धारशिव – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती नवीन सिंचन विहीर योजना या योजनांना भूजल मूल्यांकन अहवालातून वगळण्यात आल्याबाबत पुनर्विचार करून वगळलेली गावे समाविष्ट करण्यात यावीत,अशी मागणी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की भूजल मूल्यांकन अहवालानुसार धाराशिव तालुक्यातील ७७ व कळंब तालुक्यातील ४५ अशी एकूण १२२ गावे या योजनांतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित गावांतील शेतकऱ्यांना सिंचन सुविधांचा लाभ मिळत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी वरील योजनांच्या अंतर्गत वगळण्यात आलेली सर्व गावे तातडीने समाविष्ट करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी विनंती करण्यात आली आहे. हे निवेदन देताना अशोक कसबे (ऑल इंडिया पंचायत समिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते) यांच्यासह बाबासाहेब कसबे व कोंडीबा कसबे उपस्थित होते.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान