February 8, 2026

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात नुतन नगराध्यक्षा सौ.सुनंदाताई कापसे यांचा भव्य सत्कार

  • कळंब – येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने कळंब नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी (आप्पा) कापसे यांचा दि.२२/१२/२०२५ सोमवार रोजी सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
    या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शाम (नाना) खबाले,सहसचिव प्रा.संजयजी घुले, प्राचार्य डॉ.हनुमंत माने,डॉ.विद्युलता पवार,प्रा.मनिषा कळसकर,प्रा.सुनिता चोंदे तसेच सौ. घुले मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते सौ. सुनंदाताई कापसे यांचा शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
    याचप्रसंगी नुतन नगरसेवक लखन गायकवाड यांचाही शाल,पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात प्राचार्य डॉ.हनुमंत माने यांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या वतीने नुतन नगराध्यक्षा सौ.सुनंदाताई कापसे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
    यावेळी माजी प्राचार्य कांबळे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
error: Content is protected !!