कळंब – मतदारांनी माझ्यावर आणि माझी पत्नी सुनंदावर जो विश्वास दाखवला आहे,त्या विश्वासात कधीही तडा जाऊ देणार नाही.नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देत प्रामाणिक,पारदर्शक आणि लोकाभिमुख कामकाज करणे हाच माझा संकल्प आहे,असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवले. पुढे बोलताना म्हणाले की,या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल हा केवळ विजय नसून मोठी जबाबदारी असल्याचे सांगत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शहरातील मूलभूत सुविधा सक्षम करणे,पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवणे,रस्ते, स्वच्छता,सांडपाणी व्यवस्था, आरोग्य व शिक्षण सुविधा यांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच महिला,युवक,ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले. नगर परिषदेचे कामकाज हे लोकांच्या सहभागातूनच प्रभावी होते.त्यामुळे सर्व नगरसेवक, अधिकारी,कर्मचारी व नागरिकांना सोबत घेऊन समन्वयाने विकासाची घोडदौड सुरू ठेवली जाईल,असे मत त्यांनी व्यक्त केले. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल मतदारांचे आभार मानले. जनतेच्या विश्वासावरच सार्वजनिक जीवन उभे असते.तो विश्वास टिकवणे आणि अधिक बळकट करणे हेच माझ्या कार्याचे अंतिम उद्दिष्ट असेल,असे सांगून शिवाजी कापसे यांनी आपल्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट केली.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव