मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोक मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे गुरुवार,दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमास जीवन विद्या मिशन, मुंबई येथील सौ.रेवती कदम, जयसिंग खैरे,सौ.सुरेखा गाढवे यांच्यासह सहशिक्षक जनार्दन भामरे,प्रा.अमित जाधव,प्रा. दिग्विजय पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभिवादन कार्यक्रमातून शिक्षण क्षेत्रातील मोहेकर गुरुजींच्या अमूल्य कार्याचा गौरव करण्यात आला.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन