February 8, 2026

कळंबच्या ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट अभिषेक ढगारे यांची भारतीय सैन्यात निवड;महाविद्यालयात भव्य सत्कार

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोक मोहेकर यांच्या प्रेरणेने कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या ५३ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्र सेनेचा (एन.सी.सी.)कॅडेट अभिषेक ढगारे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे.
    या यशामागे एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ.के. डब्ल्यू.पावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
    या उल्लेखनीय यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल मोहेकर,उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,संचालक डॉ.संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १७ डिसेंबर २०२५,बुधवार रोजी सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयात अभिषेक ढगारे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
    सत्कार समारंभ प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान,माजी प्राचार्य सुनील पवार व उपप्राचार्य डॉ.के.डी. जाधव यांच्या हस्ते सत्कार करून निवड झालेल्या विद्यार्थ्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
    या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. जयंत भोसले,प्रा.बापू शेळके,प्रा.विलास जगताप, अधीक्षक हनुमंत जाधव,अरविंद शिंदे,प्रा.अर्चना मुखेडकर,डॉ.
    मीनाक्षी जाधव,डॉ.वर्षा सरवदे, डॉ.नामानंद साठे,डॉ.अनिल फाटक,प्रा.बालाजी राऊत,प्रा.गोविंद फेरे,प्रा.अक्षय खंडाळे,प्रा.संदीप देवकते,प्रा.अभिजित बोबडे,प्रा. बुधवंत,प्रा.सुरवसे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    अभिषेक ढगारे यांच्या या यशामुळे महाविद्यालयासह कळंब तालुक्याचा नावलौकिक वाढला असून युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.
error: Content is protected !!