कळंब – ज्येष्ठ समाजसेवक, कामगार चळवळीचे प्रणेते डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वराज अभियान,स्वराज इंडिया व भारत जोडो अभियान यांच्या वतीने बुधवार,दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.ही सभा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथील विरंगुळा हॉल येथे होणार आहे. या शोकसभेस महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या श्रद्धांजली सभेस सर्व सामाजिक कार्यकर्ते,कार्यकर्त्या व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन स्वराज इंडिया जिल्हाध्यक्ष सुभाष द. घोडके यांनी केले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी