September 21, 2026

सेवानिवृत्त बहुजन अधिकारी व कर्मचारी महासंघ तालुका अध्यक्षपदी सुभाष गायकवाड यांची नियुक्ती

  • कळंब – सेवानिवृत्त बहुजन अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या कळंब तालुका अध्यक्षपदी आयु.सुभाष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती संघटनेचे राज्य अध्यक्ष एस.आर.भोसले व मराठवाडा अध्यक्ष विनोद खंडागळे यांनी जाहीर केल्याची माहिती देण्यात आली.
    सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी व सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारे सुभाष गायकवाड यांची निवड झाल्याने कळंब तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या अनुभवाचा संघटनेच्या कार्याला निश्चितच लाभ होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    या नियुक्तीबद्दल शहरातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने आयु.सुभाष गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या भावी सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
error: Content is protected !!