धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी विविध ठिकाणी व्यापक कारवाया केल्या. धाराशिव शहर वाहतूक शाखा व संबंधित पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकूण ३६२ कारवाया करून ३ लाख २६ हजार ६५० रुपये तडजोड शुल्क वसूल केले.
🚨 अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाई
लोहारा पोलीस ठाणे हद्दीत राहुल शरणाप्पा बचाटे (रा. वडगाववाडी) याच्याकडून १,८०० रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या १८ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
वाशी पोलीस ठाणे हद्दीत दत्ता शहाजी काळे (रा. कोळेवाडी) याच्याकडून १,९०० रुपये किंमतीची १८ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
🎲 जुगारविरोधी कारवाई
भुम पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकून सुरट जुगार खेळणाऱ्या दोन आरोपींकडून १,६६० रुपये रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
🐂 प्राण्यांवर निर्दय वागणूक प्रकरणी गुन्हे
भुम पोलीस ठाणे हद्दीत रेड्यांच्या टकरी (झुंजी) आयोजित केल्याप्रकरणी अनेक आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागणूक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
परंडा पोलीस ठाणे हद्दीत ७ गोवंशीय वासरे (किंमत अंदाजे ४९ हजार रुपये) निर्दयपणे बांधून कत्तलीसाठी नेत असताना एकाला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्यात आला.
🏠 मालमत्तेविरुद्ध गुन्हे
तामलवाडी व नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतून म्हशी, शेळ्या व बोकड चोरीचे एकूण तीन गुन्हे दाखल झाले असून लाखोंचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
👊 मारहाण प्रकरणे
उमरगा व कळंब पोलीस ठाणे हद्दीत जमिनीच्या व रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत अनेक आरोपींविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
🚧 रस्ता अपघात
धाराशिव शहर, तुळजापूर व येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अपघातांत निष्काळजी वाहनचालकांमुळे मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
🔥 जाळपोळ प्रकरण
शिराढोण पोलीस ठाणे हद्दीत ग्रामपंचायत कार्यालयातील शासकीय दस्तऐवज जाळून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
धाराशिव जिल्हा पोलिसांकडून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अशीच कडक कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे जनसंपर्क विभाग,धाराशिव पोलीस यांनी स्पष्ट केले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान