August 1, 2026

विद्याभवन हायस्कूलचा स्मार्ट एग्रीकल्चरल रोबोट ठरला सर्वोत्कृष्ट!

  • तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक — जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
    माध्यमिक गटातून सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी “स्मार्ट एग्रीकल्चरल रोबोट” या अभिनव विषयावर उत्कृष्ट प्रयोग सादर केला. प्रयोगातील नावीन्य, तांत्रिक मांडणी आणि सादरीकरण कौशल्य लक्षवेधक ठरल्याने या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
    या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी, उपमुख्याध्यापक मयाचारी व्ही.एस, पर्यवेक्षक कोळी जे.एन यांच्या हस्ते अरहत वाघमारे, अनुज टिप्परसे, धीरज शेंडगे आणि वेदांत जोशी या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
    विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक —काझी सर, विनोद सागर सर, श्रीमती बचाटे आर.आर, डी.बी. पवार, सुरेश चव्हाण — यांचाही प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला.
    संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार एस. जे. यांनी केले.
error: Content is protected !!