कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग,महिला तक्रार निवारण समिती (का.ठी.म.लै.छ.प्र.नी.) यांच्या संयुक्त विद्यमाने POSH–2013 आणि POCSO–2012 या महत्त्वपूर्ण कायद्यांवरील मार्गदर्शन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत माने, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. मनिषा कळसकर, IQAC समन्वयक डॉ.अनिल जगताप,डॉ.विद्युलता पवार,प्रा. सुनिता चौदे व प्रा.राजाभाऊ चोरघडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कै. नरसिंग अण्णा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर प्रमुख मार्गदर्शक प्रा. मनिषा कळसकर यांनी विद्यार्थ्यांना POSH–2013 कायद्याची सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या की, “कामाच्या ठिकाणी महिलांना होणारा छळ रोखणे आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे हा POSH कायद्याचा मुख्य उद्देश आहे.” तसेच POCSO–2012 कायदा लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत माने यांनी विविध कायद्यांची माहिती देत विद्यार्थिनींना महाविद्यालय परिसरात कुठलाही त्रास झाल्यास तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले. महाविद्यालय तुमच्या सुरक्षेसाठी नेहमी कटीबद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजाभाऊ चोरघडे यांनी केले. प्रस्तावना प्रा. डॉ. विद्युलता पवार यांनी केली तर आभार प्रदर्शन प्रा. सुनिता चोंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अमोल शिंगटे, प्रा. बाबू पवार, प्रा. नामदेव तोडकर, प्रा. विजय घोळवे, प्रा. सोमनाथ कसबे व श्री. दत्ता कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन