कळंब – विश्वरत्न, संविधान शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कळंब येथील डॉ.आंबेडकर चौकात डॉ. आंबेडकर स्मारक समितीतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमातील प्रारंभी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामाजिक बांधवांनी महामानवाला आदरांजली वाहिली. या प्रसंगी माजी नगरसेवक सुनील भाऊ गायकवाड, प्रा. शंकर कांबळे, बंडूभाऊ बनसोडे, राजाभाऊ गायकवाड, प्रमोद ताटे, मोहन गायकवाड, संजय गायकवाड, मेजर रणदिवे, शिवाजी शिरसाट, शुभम गायकवाड, लहू तीरकर, सावंत यांच्यासह अनेक मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामानवाच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या विचारांची उजळणी करत समाजात बौद्ध-आंबेडकरी आदर्श पुढे नेण्याची प्रतिज्ञा उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड