कळंब –महापुरुषांच्या विचारांचा दीप आजही तितक्याच तेजाने झळकत आहे,हे प्रत्यक्ष अनुभव देत,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने दि.६ डिसेंबर २०२५ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी (अप्पा) कापसे,माजी नगरसेवक सुनील गायकवाड,रोहन पारख, बंडूभाऊ बनसोडे,अनिल हजारे, प्रमोद ताटे,राजाभाऊ गायकवाड, सुमित रणदिवे,शिवाजी शिरसाट, मोहन गायकवाड,संजय गायकवाड आदींचा विशेष सहभाग राहिला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांच्या आदर्श,संघर्ष आणि समतामूल्यांनी प्रेरित होत समाजरंगात एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात करण्यात आला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी