February 8, 2026

मोहा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला श्रद्धांजली

  • मोहा – भारतरत्न,संविधान शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोहा येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच उपस्थितांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून महामानवाला सामूहिक श्रद्धांजली वाहिली.
    या कार्यक्रमास ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हाध्यक्ष अशोक कसबे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कसबे,आकाश कसबे,कोंडीबा कसबे,गणेश कसबे,अजय कसबे, शुभम कांबळे,साई गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.
    डॉ.बाबासाहेबांच्या विचारांनी समाजाला दिशा दिली असून, समानता-बांधवता-न्याय या मूल्यांचे स्मरण महापरिनिर्वाण दिनी करण्यात येत असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध आणि श्रद्धापूर्वक पार पडला.
error: Content is protected !!