February 8, 2026

जि.प तांदुळवाडी शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  • कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांदुळवाडी येथे दि.६ डिसेंबर २०२५ रोजी महामानव व प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक व राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य सरचिटणीस संतोष भोजने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दूरदृष्टीपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि कृतीशील जीवनपट प्रभावी शब्दांत उलगडला.त्यांनी डॉ. आंबेडकर केवळ दलितांचे उद्धारक नव्हे,तर सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक,आरोग्य व शेती क्षेत्रातही काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे जागतिक विचारवंत असल्याचे विद्यार्थ्यांना सोप्या शब्दांत समजावून सांगितले.

  • शाळेतील सहशिक्षक संतोष मोहिते व श्रीमती रसिका आगरकर यांनीही प्रसंगानुरूप मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर घातली.
    कु.ऋजुता मोरे,अंकिता अंबुरे, श्रुती माने यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून तर श्रेया डिकले, अक्षरा बनसोडे,सम्यक राऊत यांनी गीतांच्या माध्यमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. तसेच चि.संघरत्न राऊत,प्रज्वल बाकले,अजिंक्य नाईकनवरे, शिवम डिकले आणि सार्थक धाबेकर यांनी प्रभावी भाषणातून आदरांजली अर्पण केली.
    कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थीनी कु.अंकिता अंबुरे हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तिने शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिल्याने कार्यक्रमाला विशेष भावनिक रंग प्राप्त झाला.
    या उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षिका श्रीमती आशा पवार यांनी केले,तर आभार प्रदर्शन सयाजी शिंदे यांनी मानले.
error: Content is protected !!