मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर आणि सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.४ डिसेंबर २०२५,गुरुवार रोजी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे संस्थापक अध्यक्ष कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर यांनी शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण केली. या प्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे,पर्यवेक्षक सतीश कानगुडे,उच्च माध्यमिक विभागप्रमुख प्रा.सुनील साबळे, सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुजींच्या स्मृतिदिनी त्यांच्या कार्याचा गौरव,संस्थेच्या प्रगतीचा संकल्प आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्काराचे मूल्य रुजवण्याचा संदेश देत कार्यक्रमाचे औचित्य साधले गेले.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन