February 8, 2026

मोहेकर महाविद्यालयात जागतिक एड्स निर्मूलन दिन उत्साहात साजरा

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब,राष्ट्रीय सेवा योजना विभाग,रेड रिबन क्लब व उपजिल्हा रुग्णालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स निर्मूलन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
    जगभरात १ डिसेंबर ते १५ डिसेंबर हा पंधरवाडा जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना एचआयव्ही एड्स या आजाराचे प्रचार व प्रसार तसेच प्रतिबंधक उपाय या संदर्भात जनजागृती करण्यात आली.एच आय व्ही एड्स या संदर्भात कारणे व उपाय योजना यासंदर्भात माहिती देण्यात आली.या कार्यक्रमाचे औचित्य साधून या आजारासंदर्भात विद्यार्थी विद्यार्थिनींना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.एन. एम.अंकुशराव यांनी शपथ दिली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.कमलाकर जाधव, प्रा.डॉ.चिंते,प्रा.डॉ.महाजन,प्रा.डॉ. श्रीकांत भोसले,डॉ.मीनाक्षी जाधव,प्रा.डॉ.आदाटे,प्रा.अर्चना मुखेडकर,प्रा.वाघमारे मॅडम, प्रा.पांचाळ मॅडम, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ. ताटीपामुल,डॉ.चांदोरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी अजय भावे उपस्थित होते.हा कार्यक्रम पार पडण्यासाठी महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव व सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!