कळंब – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा.डॉ.मीनाक्षी भवर या कळंब शहराच्या सर्वांगीण विकासाचे ठोस व्हिजन घेऊन मतदारांसमोर आल्या असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. अहिल्याबाई होळकर चौक,कळंब येथे आयोजित भव्य प्रचार सभेत त्यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, “कळंबच्या विकासासाठी निधीची कमतरता येऊ देणार नाही.शहराच्या विकासाची संपूर्ण जिम्मेदारी माझी व आमदार विक्रम काळे यांची आहे.घड्याळ आणि तुतारी हे आपले विकासाचे प्रतीक आहे, युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.” सभेत उपस्थित आमदार ईद्रीस नाईकवाडी,आमदार विक्रम काळे आणि डॉ.बाळकृष्ण भवर यांनीही कळंब शहराच्या विविध विकास प्रश्नांचा मागोवा घेत युतीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा. डॉ.मीनाक्षी भवर यांनी त्यांच्या मनोगतात शहराचा नियमित पाणीपुरवठा,डिजिटल शाळा, आरोग्यसुविधा,स्वच्छ–सुंदर शहर, युवकांसाठी रोजगार या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडली. कळंब शहराला आधुनिक आणि सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर नेणे हा माझा संकल्प आहे,असे त्या म्हणाल्या. या प्रसंगी भास्कर खोसे व भागवत धस यांनी मंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार केला.कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी लकडे,विविध पदाधिकारी व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲड. प्रवीण यादव यांनी तर आभार प्रदर्शन शंतनु खंदारे यांनी केले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड