- “तुम्ही मला साथ द्या… मी तुम्हाला सत्ता देतो!” – आनंदराज आंबेडकरांचे धाराशीवच्या तरुणांना भावनिक आवाहन
- कळंब – संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन सेना धाराशीवच्या वतीने कळंब येथे भव्य संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात आली.या कार्यक्रमाला रिपब्लिकन सेनेचे संस्थापक सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थित होते. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या सन्मान सभेत मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.सरसेनानी आंबेडकर यांचा संविधान प्रत,हार व शाल देऊन सन्मान करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
रिपब्लिकन सेनेचे प्रमुख सरसेनानी आयु.आनंदराजजी आंबेडकर साहेब यांचा शहरात विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी शहरातून प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावनज्योतच्या अंकाची प्रत कार्यकारी संपादक आयु.अविनाश घोडके यांच्या हस्ते सरसेनानींच्या सुपूर्त करण्यात आली.
कार्यक्रमाला रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आयु.अनिल हजारे यांचीही उपस्थिती होती.
-
सभेला संबोधित करताना आदरणीय सरसेनानी आंबेडकर यांनी धाराशीव जिल्ह्यातील तरुणांना भावनिक आवाहन करत म्हटले —
“तुम्ही मला साथ द्या… मी तुम्हाला सत्ता देतो!”
त्यांनी पुढे सांगितले की,
वर्षानुवर्ष रस्त्यावर लढून अनेक तरुणांची आयुष्ये चळवळीच्या नावाखाली उध्वस्त झाली. आता त्या तरुणांना सत्तेची स्वप्न देऊन त्यांचे उज्वल भविष्य घडविण्याचा कार्यक्रम मी करीत आहे. आपल्या तरुणांमध्ये असलेले कौशल्य आणि कॅलिबर सत्तेत नेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशात संविधानविरोधी वातावरण तयार करण्यामागे ब्राह्मणवादी शक्तींचे मोठे षडयंत्र असल्याचे सांगत त्यांनी हे षडयंत्र रोखण्यासाठी सत्ता मिळवणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
“बाहेर राहून आपण केवळ आपले आयुष्य उध्वस्त करू शकतो; पण सत्तेमध्ये गेल्याशिवाय लढा यशस्वी होत नाही,” असे ते म्हणाले.
जनतेला सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन सेना–शिवसेना (एकनाथ शिंदे) युती ही एक मजबूत राजकीय डिप्लोमसी असल्याचे त्यांनी नमूद केले.
“मी तुम्हाला सत्तेत पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास महिला,तरुण आणि कार्यकर्त्यांचा या सभेला प्रचंड प्रतिसाद होता.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रिपब्लिकन सेना धाराशीवचे जिल्हाप्रमुख अनिल हजारे होते.
या वेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.सुशील सूर्यवंशी,महाराष्ट्र नेते प्राचार्य सुनील वाकेकर,प्रा.युवराज धसवाडीकर,जिल्हा प्रभारी कपिल सरोदे,नेते मुजीबभाई पठाण, माधव दादा जमदाडे,यशवंत भालेराव, प्रा. सिद्धोधन मोरे यांनी मार्गदर्शन केले.या सभेत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. त्यामध्ये प्रमुख शंकर माने,सुमित साबळे,काका शिकरे,तांबे मामा,विजय शितोळे, भगवान हजारे,नागेश जाधव, अमित माने,चंद्रवर्दन माने,तसेच बीडमधील मुस्लिम समाजाचे रफिक शेख आदींचा समावेश होता.
हा कार्यक्रम भव्य आणि यशस्वी करण्यासाठी अनिल हजारे, मुजीबभाई पठाण,सुरज वाघमारे, सतपाल बचुटे,राहुल गाडे,गौतम बनसोडे,शरद आदमाने,शरद हजारे,आप्पासाहेब हजारे,पवन हजारे,सुहास इंगळे,अनिल गायकवाड,अजय माने,हिराताई ओव्हाळ,बबन सोनटक्के,आशोक थोरात,सतिश शिंदे,प्रदीप ताकपिरे,अमोल मस्के,उत्तम सावंत,अमोल पवार,रविंद्र ओव्हाळ,उत्तम पाचपिंडे,अरुण कांबळे,जय कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जहीर एकनाथ यांनी केले व आभार प्रदर्शन सुरज वाघमारे यांनी केले.

More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार