धाराशिव (जिमाका) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीन दरवर्षी २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये जिल्हास्तर,तालुकास्तर, गावपातळीवर संविधान दिन २६ नोंव्हेबर हा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे. धाराशिव येथे २६ नोंव्हेबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता भारतीय संविधान व मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधान व मतदान जनजागृती रॅलीचे उदधाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व पोलीस अधिक्षक श्रीमती.रितू खोखर यांची उपस्थिती राहणार आहे. भारतीय संविधान मतदान जनजागृती रॅलीमध्ये महाविद्यालयाचे,माध्यमिक शाळेचे विद्यार्थी तसेच एन.सी.सी., एन.एस.एस.,स्काऊट गाईड चे विद्यार्थी यांचा समावेश राहणार आहे.भारतीय संविधान जनजागृती रॅलीचे मार्ग मल्टीपर्पज हायस्कूल,जिल्हा परिषद,ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयास अभिवादन करुन यशवंतराव चव्हाण सभागृह,जिल्हा परिषद येथे रॅलीचा समारोप होणार आहे.अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन केवले यांनी दिली.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य