कळंब – कळंब शहराच्या सर्वांगीण विकासाची हमी आणि स्वच्छ,पारदर्शक प्रशासनाचा संकल्प घेऊन महायुतीच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक ६ मध्ये जनसंपर्काचा धडाका सुरू केला आहे.नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार सौ.सुनंदा शिवाजी कापसे,नगरसेवक पदासाठी उमेदवार हर्षद अंबुरे आणि नगरसेविका पदासाठीच्या उमेदवार डॉ. सारिका वाघ यांनी दि.२१ नोव्हेंबर २०२५ वार शुक्रवार रोजी प्रभागातील व्यापारी,घराघरातील नागरिक आणि विविध घटकांशी संवाद साधत मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. शहराच्या विकासाचा ठोस आराखडा,महिलांचे सबलीकरण, युवकांसाठी रोजगारनिर्मिती, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर आधारित उपक्रम राबवण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला. शहरात “विकासाचा मार्ग फक्त धनुष्यबाणाचाच!”असा उत्साही वातावरणात प्रचार संदेश मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या जनसंपर्क दौऱ्यात रोहित कापसे,ईश्वर ताटे,बालाजी कापसे, बळी चव्हाण,अशोक गरड, आकाश पारेकर,मोहिनी शिंदे, स्वाती कापसे,जय कापसे आदी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी साक्षी पावनज्योत चॅनेलवर उमेदवारांनी थेट संवाद साधत प्रभाग ६ मधील मतदारांना विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रभागात निवडणुकीचे वातावरण तापले असून,नागरिकांमध्ये विकास,नागरी सोयी-सुविधा आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर चर्चा रंगत आहेत. मतदारांच्या अपेक्षा ओळखून “कळंब शहराला खरे नेतृत्व देण्याचा आमचा संकल्प आहे,” असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड