August 9, 2026

चंद्रकांत वाघमारे यांचा मुख्याध्यापक पदोन्नतीनिमित्त सत्कार

  • कळंब – सर्वोदय विद्यालय, भोगजी (ता. कळंब) येथे मुख्याध्यापक पदावर नुकतीच पदोन्नती मिळाल्याबद्दल चंद्रकांत वाघमारे यांचा दि.२१ नोव्हेंबर २०२५ रोजी लोक कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, शेळका-धानोरा तर्फे संस्थेचे सचिव कमलाकर शेवाळे यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
    या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये जि.प. मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, नवनाथ आडसुळ,बालाजी आडसुळ,माजी मुख्याध्यापक संजय जगताप,सतिश मडके, प्रा.दिग्विजय पाटील,साजेद शेख, राहुल शेवाळेआदींची उपस्थिती होती.यावेळी सर्व मान्यवरांनी वाघमारे सरांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!