कळंब (माधवसिंग राजपूत) – कळंब नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रक्रिया वेगात सुरू आहे.नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या नामांकनपत्रांची छाननी झाली असता 9 उमेदवार वैध ठरले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी (21 नोव्हेंबर) तीन उमेदवारांनी माघार घेतली असून आता 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नगरसेवक पदासाठी,10 प्रभागांतील (अ व ब) एकूण 20 जागांसाठी 94 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.पण यापैकी 27 उमेदवारांनी माघार घेतल्याने अंतिमतः 67 उमेदवार स्पर्धेत राहिले आहेत. अध्यक्षपद (सर्वसाधारण महिला) : प्रमुख 6 उमेदवार ही पुढीलप्रमाणे – कापसे राणी उर्फ सुनंदा शिवाजी – शिवसेना,मुंदडा रश्मी संजय – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),भवर मीनाक्षी श्रीधर – राष्ट्रवादी काँग्रेस,गोरे कविता निवृत्ती,बनसोडे मनीषा सतपाल,शेख शेहनाज अनिस आज माघार घेणाऱ्यांमध्ये चोंदे मिराबाई भागवत, खान अमरीन जावेद, सपाटे ज्योती प्रकाश यांचा समावेश आहे. कळंब नगरपरिषद निवडणुकीत यंदा तिरंगी सामना रंगणार आहे. लढतीत प्रमुख आघाड्या पुढीलप्रमाणे — शिवसेना – भाजप महायुती,शिवसेना (उबाठा) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आघाडी,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – संयुक्त लढत ,निवडणूक चिन्हांचे वाटप 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी